आपल्या संगणाकावर खूप सारे क्विक लॉन्च आयकॉन ठेवले, तर आपल्या संगणकाची गती कमी होते. आणि म्हणूनच संगणकावर कमीतकमी क्विक लॉन्च आयकॉन्स ठेवणं आवश्यक आहे. अनेकदा काय होतं!? आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो आणि मग आपल्या नकळतच आणखी एका क्विक लॉन्च आयकॉनची भर पडते. अशावेळी नको असलेल्या आयकॉन्सवर राईट क्लिक करुन Exit होऊन, आपण त्यांना तात्पुरतं घालवू शकतो. पण नको असलेल्या क्विक लॉन्च आयकॉनला जर कायमस्वरुपी घालवून टाकायचं असेल तर?


१. संगणकावर डाव्या कोपर्‍यात खाली असणार्‍या “start” या बटणावर जा.


२. त्यानंतर “Run” या पर्यावर क्लिक करा.

३. आता open समोर “msconfig” हे शब्द टाईप करा. आणि ok वर क्लिक करा.

४. System Configuration Utility या नावाची विंडो ओपन होईल.

५. त्या विंडोच्या startup या पर्यायावर क्लिक करा.

६. तुमचा संगणक सुरु केल्यानंतर... “जे प्रोग्राम्स लगेच सुरु होऊ नयेत, असं तुम्हाला वाटत असेल” (टास्कबारवरचे आयकॉन्स घालवायचे असतील), त्यांच्यासमोरील टिकमार्क काढून टाका.

७. तुमची निवड झाल्यानंतर ok वर क्लिक करा.

८. पुढच्यावेळी संगणक सुरु केल्यानंतर, तुम्हाला हवे आहेत, असेच आयकॉन्स तुम्हाला दिसून येतील.